नवी दिल्ली: भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. ज्याचा धसका पाकिस्तानने घेतला असुन, पाकिस्तानी नेत्यांकडून पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असे बिथरलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला इशारा दिला आहे. ज्यावर NSA अजीत डोवाल यांनी पलटवार करताना सांगितले की, “जर काहीही केले, तर त्याचे चोख प्रत्युत्तर देण्यास भारत तयार आहे.”
बुधवारी रात्री पाकिस्तानला संबोधित कयांनी भारताला उघड धमकी दिली आहे. काल रात्री झालेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल, असे शाहबाज शरीफ म्हणाले. दरम्यान, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शाहिद म्हणवत, प्रत्येक शहीदाच्या रक्ताचा बदला घेतला जाईल, अशी पोकळ धमकी त्यांनी दिली.
ओपरेशन सिंदूरनंतर शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये मंत्री, लष्करप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत भारताचा हल्ला बेकायदेशीर आणि विनाकारण असल्याचे म्हंटले गेले. पाकिस्तानी संसदेत भाषण करताना शाहबाज यांनी दावा केला की त्यांच्या सैन्याने पाच भारतीय विमाने पाडली. त्यांनी सांगितले की हल्ल्यात ८० भारतीय विमाने सहभागी होती परंतु पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाने त्यांना हाणून पाडले. तथापि, यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. एअर स्ट्राइकनंतर, ही कारवाई मर्यादित, संयमी आणि दहशतवादविरोधी असल्याचे भारताने संपूर्ण जगाला सणीतले आहे. यासंदर्भात एनएसए अजीत डोवाल म्हणाले की, भारताला युद्ध नको आहे, परंतु पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार आहोत.”
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पुरता घाबरला आहे. भलेही पाक नेते भारताला पोकळ धमक्या देत असले तरी, या देशाने संपूर्ण रात्र भीतीत घालवली. इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराचीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज खंडित झाली.
बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानने हवाई हल्ल्यांच्या भीतीने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये एअरस्पेस बंद केली. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ४८ तासांसाठी उड्डाणे रद्द केली होती. आता एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. कराची एअरस्पेस मात्र सुरू आहे.
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…