Thursday, May 8, 2025
Homeमहत्वाची बातमीपाकने केला 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा, पण पुरावा देताना बोबडीच वळली

पाकने केला 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा, पण पुरावा देताना बोबडीच वळली

जम्मू आणि काश्मीर: भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरात 7 मे च्या पहाटे, नऊ कुख्यात दहशतवाद्यांचे तळ नामशेष केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून याविषयी माहिती देण्यात येत आहे. ज्यामध्ये, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण केलं. तेव्हा ते म्हणाले, पाकिस्तानचं सैन्य या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयार होतं. भारताने खरेदी केलेल्या राफेल विमानावर खूप गर्व केला, पण जास्त गर्व करायचा नसतो, कारण आम्ही भारताची 5 विमाने पाडली, ज्यात 3 राफेल आहेत, ” असा दावा त्यांनी केला. पण याचा ठोस पुरावाच पाककडे नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जनतेला संबोधित करताना, शरीफ पुढे म्हणाले, “हवाई दल प्रमुख जहिर बाबर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी भारताच्या राफेल विमानांचं कम्युनिकेशन लॉक केलं. 80 विमानांच्या माध्यमातून भारतानं 6 ठिकाणी हल्ले केले. आम्ही त्यांची 3 राफेल विमानं पाडली.”

खरंच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडलं का?

ऑपरेशन सिंदूरने 9 दहशतवादी स्थळे उद्भवस्त केल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान करत असलेला हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आता समोर येत आहे. सीएनएला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा शरीफ आसिफ यांनी पाकिस्तानने पाच भारतीय विमाने पाडल्याच्या त्यांच्या दाव्याचे श्रेय सोशल मिडियावरील पुराव्यांवर दिले. पाच भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्याचे पुरावे मागीतले असताना त्यांनी सांगितले की, “ही सर्व सोशल मिडियावर आहे, भारतातील सोशल मिडियावर त्याची माहिती आहे, पाकिस्तानच्या सोशल मिडियावर ते दिसत नाही.” इतकेच नव्हे यानंतर ते असे ही म्हणाले की, भारतीय विमानांची अवशेष काश्मीरमध्ये पडले आहेत. लढाऊ विमाने कशी पाडली आणि कोणती उपकरणे वापरली गेली याबद्दल अधिक माहिती देखील त्यांना देता आली नाही.

दरम्यान पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात पाक पंतप्रधान यांनी पहलगाम हल्ला खेदजनक आहे आणि पाकिस्तानचा या हल्ल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे म्हंटले आहे. आम्ही एका आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती, त्या चौकशीला आम्ही सहकार्य करण्याची ऑफर दिली, पण भारताने ती ऑफर मानली नाही, अशी मुक्ताफळं उधळली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -