Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, 'या' भागात यलो अलर्ट

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत आणि आसपासच्या विभागात तुरळक पाऊस (Mumbai Rain Update) सरी बरसल्या असून, सखल भागात पाणी तुंबल्याचे वृत्त आहे.

मे च्या ऐन उन्हाळ्यात अवकळी पाऊस सलग दोन दिवस राज्याला चांगलाच झोडपत आहे. मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या ठिकाणांची देखील तीच अवस्था आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत अवकाळी पाऊस मुसळधार

दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली आणि अंधेरीमध्ये ऐन उन्हाळ्यात पाऊसाने हजेरी लावली. पावसामुळे मुंबई उपनगराच्या अंधेरी आणि गोरेगाव येथील सखल भागांत पाणी साचले. तसेच मुंबई आसपासच्या परिसरात तसेच ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला.

पुढील 4 ते 5 दिवस पाऊस

राज्यात कधी उन्ह तर कधी पाऊस असे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी झालेल्या पावसाने चांगलेच जोडपले आहे. पालघर पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम मच्छिमारांवरही झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये 40 ते 45 बोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 आणि 8 मे, सिंधुदूर्गमध्ये 8 मे, रायगड जिल्ह्यामध्ये 6 आणि 7 मे रोजी वादळी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे, या भगत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -