नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हल्ला परतवल्यानंतर भारताने भर दिवसा ८ मे रोजी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे लाहोर, कराचीसह वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रोन दिसल्याच्या आणि स्फोट झाल्याच्या बातम्या देत आहेत.
On the night of 07-08 May 2025, Pakistan attempted to engage a number of military targets in Northern and Western India including Awantipura, Srinagar, Jammu, Pathankot, Amritsar, Kapurthala, Jalandhar, Ludhiana, Adampur, Bhatinda, Chandigarh, Nal, Phalodi, Uttarlai, and Bhuj,… pic.twitter.com/x0KKDWzfoH
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानने ०७ मे – ०८ मे २०२५ च्या रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष्य निष्क्रिय केले. पाकिस्तानच्या हल्ल्यांचे ठोस पुरावे भारताच्या हाती आहेत.
पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने गुरुवार ७ मे रोजी भर दिवसा हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य करुन कारवाई केली. भारताच्या कारवाईत लाहोरमधील लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे.
पाकिस्तानी गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यात आतापर्यंत तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार आणि तोफांचा मारा थांबवण्यासाठी भारताने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट
भारतात पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवार ८ मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते शुक्रवार ९ मे रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत असा रात्रभर ब्लॅकआऊट असेल. या ब्लॅकआऊटची घोषणा प्रशासनाने थोड्या वेळापूर्वीच केली आहे.