नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. याला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानचे हल्ले परतवले जात आहेत.
भारताच्या काऊंटर अॅटॅकनंतर पाकिस्तानमध्ये भूकंप आला आहे. लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि बहावलपूरमध्ये सायनर वाजले आहेत. पाकिस्तानला भारतीय लष्कराकडून दिल्या जात असलेल्या कारवाईदरम्यान भारतीय नौदलही कारवाईच्या तयारीत आले आहेत. भारतीय नौदलाचे पश्चिमी कमांड पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सामील करण्याची योजना बनवली जात आहे.
कच्छमध्ये भारताने पाकिस्तानचे ३ ड्रोन पाडले
गुजरातच्या कच्छ सीमेवर पाकिस्तानचे सहा ड्रोन पाहिले. गेल्या ३ तासांपासून हे ड्रोन दिसत होते. यातील ३ ड्रोन पाडले आहेत.
भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि इस्लामाबादमध्ये तोफगोळे सोडले
भारताने पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निमग अँड कंट्रोल सिस्टीमला पंजाब प्रांतात मारले.
भारताने लाहेरमध्ये मोठा हल्ला सुरू केला.
पाकिस्तानवर हल्ल्यासाठी राजस्थामधून फायटर जेट उडाले आहेत.