नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना, चीनने भारताच्या कृतींना खेदजनक म्हंटले आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समस्त भारतीयांच्या कपाळावर आठ्या पाडणारी आहे. त्यांनी भारतीय लष्कराने केलेल्या दहशतवादविरुद्ध कारवाईला ‘लज्जास्पद’ असे म्हंटलं आहे.
भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र डागली. यादरम्यान, एक-दोन नव्हे तर नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले. ज्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. याबद्दल संपूर्ण जगातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना, अमेरिकेचा दृष्टिकोन पुन्हा एकदा अत्यंत बेजबाबदार असल्याचे दिसून आले.
भारताच्या या कृतीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले आहे. त्यांनी ही कृती लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हे लज्जास्पद आहे. मी हल्ल्याबद्दल नुकतेच ऐकले. भारत आणि पाकिस्तान बऱ्याच काळापासून एकमेकांशी लढत आहेत. मला आशा आहे की त्यांच्यामधील संघर्ष खूप लवकर संपेल.”
पहा व्हिडीओ-
ही तीच अमेरिका आहे जिच्यावर ९/११ ला हल्ला झाला तेव्हा संपूर्ण अफगाणिस्तान उद्ध्वस्त झाला होता. त्याने पाकिस्तानच्या घरात घुसून ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. ओसामा बिन लादेन बराच काळ अबोटाबादच्या डोंगरात लपून बसला होता. अफगाणिस्तानातील तालिबानविरुद्धच्या युद्धात त्यांनी हजारो निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. त्यामुळे, अमेरिका दहशतवादाकडे स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी पाहते हे यातून सिद्ध होते.
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…