Thursday, May 8, 2025
Homeमहत्वाची बातमी८ कोटीचे स्कॅल्प मिसाईल, ८४ लाखाचा हॅमर बॉम्ब, या घातक शस्त्रांनी उडवल्या...

८ कोटीचे स्कॅल्प मिसाईल, ८४ लाखाचा हॅमर बॉम्ब, या घातक शस्त्रांनी उडवल्या दहशतवाद्यांच्या चिथड्या

मुंबई: ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ज्या क्षेपणास्त्रांनी आणि शस्त्रांनी हल्ला केला, ती अत्यंत घातक आणि महागडी शस्त्रे आहेत. ज्यात SCALP क्षेपणास्त्रे, हॅमर बॉम्ब आणि कामिकाझे ड्रोनचा समावेश आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 ठिकाणी असलेल्या दहशतवादी छावण्यांना निवडकपणे लक्ष्य केले. या दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले करण्यासाठी तिन्ही सैन्यांनी अत्यंत शक्तिशाली शस्त्रे वापरली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोटेरिंग दारूगोळा यासह लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. चला तुम्हाला या शस्त्रांची किंमत सांगतो.

SCALP क्षेपणास्त्रची किंमत आणि हल्ला करण्याची क्षमता

SCALP क्षेपणास्त्र, हे घातक शस्त्रांच्या यादीत मोडते. ज्याला युकेमध्ये स्टॉर्म शॅडो असे म्हंटले जाते. हे क्षेपणास्त्र २५० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे हवेतून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे खोलवर मारा करण्याच्या क्षमतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची प्रती किंमत साधारणतः $1 दशलक्ष (रु. 8,46,18,118) इतकी आहे.

हॅमर बॉम्बची किंमत आणि कार्यक्षमता

मजबूत बंकर आणि बहुमजली इमारतींना भुईसपाट करण्यासाठी हॅमर (हायली अ‍ॅजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज) स्मार्ट बॉम्बचा वापर करण्यात येतो. या बॉम्बच्या मदतीने लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) सारख्या दहशतवादी गटांकडून प्रशिक्षण आणि रसद केंद्रे म्हणून वापरल्या जाणारे ठिकाणे नामशेष करण्यात आली. हॅमर बॉम्ब हे एक अचूक शस्त्र आहे, जे ५०-७० किलोमीटरच्या पल्ल्याच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. मिलिटरी इक्विपमेंट अँड एव्हिएशन गाइडच्या अहवालानुसार, हॅमर बॉम्बची प्रति युनिट किंमत सुमारे $१००,००० (८४,६२,५५० रुपये) इतकी आहे. याची किंमत बॉम्बच्या आकार आणि क्षमतेवर अवलंबून असते.

‘कामिकाझे ड्रोन’ची किंमत आणि वापर

दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, लक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि अंतिम हल्ला करण्यासाठी कामिकाझे ड्रोनचा वापर केला जातो. या ड्रोनला लोइटरिंग म्युनिशनचा असे देखील म्हणतात. २०२३ मध्ये कामिकाझे ड्रोनची प्रति युनिट किंमत $१०,००० (रु. ८,४६,२५५) ते $५०,००० असल्याचे नोंदवले गेले आहे.

दहशतवाद्यांनी पहलगाम येथील पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर त्यावर योग्य उत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. कोणी कल्पनाही करणार नाही असा हल्ला चढवला जाईल असं ते म्हणाले होते. त्यानुसार ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ऐतिहासिक ठरणारी लष्करी कारवाई केली. ज्यामध्ये राफेल या जेट विमानाचा वापर करण्यात आला, तसेच या कारवाईत भारताने वरीलप्रमाणे अत्याधुनिक आणि अचूक दारुगोळा वापरला, ज्यामुळे कमीत कमी नागरी नुकसानीसह जास्तीत जास्त परिणाम सुनिश्चित करण्यास मदत मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -