मुंबई: जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता, तेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती सकाळी भारतीयांना मिळताच, ‘धर्मो रक्षति रक्षित:’ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला,
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशवाद्यांचे तळ हवाई हल्ल्याद्वारे बेचिराग करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे समर्पक नाव देण्यात आले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात, भारतीय स्त्रियांचे सिंदूर पुसले गेले. हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, त्यांची ही कृती क्लेशदायी आणि संतापजनक अशीच आहे. ज्याचा देशभरात निषेध झाला. त्यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होऊ लागली. आणि त्याच पार्श्वभूमीवर देशवासीयांच्या भावना जपत भारतीय लष्कराने दहशतवाद विरुद्ध मोठी कारवाई करत, बिळात लपून बसलेल्या अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईची माहिती भारतीयांना मिळताच, “धर्मो रक्षति रक्षित:” हा श्लोक सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होऊ लागला. धर्मो रक्षती रक्षिता: हा संस्कृत श्लोक आणि ऑपरेशन सिंदूरचा एकमेकांशी काय संबंध आहे? याबद्दल जाणून घेऊया…
सोशल मीडियावर ‘धर्मो रक्षिती रक्षितः’ झाला ट्रेंड
‘धर्मो रक्षति रक्षितः’ हा व्हायरल होत असलेला श्लोक पूर्ण जरी नसला तरी हा एक लोकप्रिय संस्कृत वाक्प्रचार आहे, ज्याचा उल्लेख महाभारत आणि मनुस्मृतीतही आहे. याचा अर्थ असा की जर आपण धर्माचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो. या श्लोकाचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया…
ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध?
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर ‘धर्मो रक्षति रक्षिता’ हा श्लोक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हा श्लोक धर्माच्या शक्तीचे प्रतीक असून, याबरोबरच सर्वत्र भारत माता की जयच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत. हा श्लोक दर्शवतो की हा धर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. जर कोणी या धर्माविरुद्ध कट रचला तर हा धर्म त्याचा नाश करतो. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ चा उल्लेख महाभारतात देखील आढळतो .
मनुस्मृतीच्या संपूर्ण श्लोकाचा भाग
हा संस्कृत वाक्प्रचार मनुस्मृतीच्या संपूर्ण श्लोकाचा भाग आहे, जो पुढीलप्रमाणे आहे…
धर्मो एव हतो हंति धर्मो रक्षिती रक्षितः.
तस्माधर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हटोवधित ।
म्हणजेच, जेव्हा धर्म नष्ट होतो, तेव्हा तो त्याचा नाश करणाऱ्यांचा नाश करतो आणि संरक्षित धर्म त्याचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणून, आपण कधीही धर्माचे उल्लंघन करू नये जेणेकरून नष्ट झालेला धर्म आपल्याला कधीही नष्ट करणार नाही.