Thursday, May 8, 2025
Homeमहत्वाची बातमीOperation Sindoor: जैशचे ४, लष्करचे ३ आणि हिजबुलचे २ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Operation Sindoor: जैशचे ४, लष्करचे ३ आणि हिजबुलचे २ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (७ मे २०२५) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Air Strike) अंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची यादी उघड करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने यशस्वीरित्या नष्ट करण्यात केली आहेत.

  • मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर – जैश
  • मरकज तैयबा, मुरीदके – लष्कर
  • सरजल, तेहरा कलान – जेईएम
  • मेहमूना झोया, सियालकोट – एचएम
  • मरकज अहले हदीस, बर्नाला – लष्कर
  • मरकझ अब्बास, कोटली – जैश
  • मस्कर राहील शाहिद, कोटली – HM
  • शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद – लष्कर
  • सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद – JEM

भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय श्रीनगर एअरपोर्ट इंडियन एअर फोर्सने ताब्यात घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -