Wednesday, May 7, 2025
HomeदेशOperation Sindoor : भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला,रात्री १.३० वाजता एअरस्ट्राईक आणि...

Operation Sindoor : भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला,रात्री १.३० वाजता एअरस्ट्राईक आणि रडत राहिला पाकिस्तान

नवी दिल्ली: २२ एप्रिल २०२५, तो काळा दिवस जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे २६ निर्दोष लोकांना मारले. केवळ जीवच घेतला नाही तर असे घाणेरडे कृत्य केले ज्याने संपूर्ण मानवतेला काळिमा फासला जाईल. ज्या निर्दोष लोकांना मारण्यात आले त्यांना त्यांचा आधी धर्म विचारण्यात आला.

या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश केंद्रातील मोदी सरकारकडून दहशतवादाविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करत होता. प्रत्येकाला वाटत होते निर्दोष लोकांच्या मृत्यूचा बदला भारतीय लष्करांने या दहशतवाद्यांना मारून घ्यावा.

हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे दहशतवादाविरोधात कडक कारवाईची घोषणा केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल. मोदी म्हणाले होते की प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे समर्थन करणाऱ्या ओळख पटवेल आणि त्याला शिक्षा दिली जाईल. दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आलीये

मधुबनीमध्ये दिलेला शब्द झाला पूर्ण

७ एप्रिल २०२५ ही तारीख जी पाकिस्तान नेहमी लक्षात ठेवेल. दहशतवादाच्या पनाहगर पाकिस्ताना भारतीय सैन्याने एकामागोमाग एक ९ एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.

रात्री १.४४ वाजता दिली एअरस्ट्राईकची माहिती, रडत राहिला पाकिस्तान

भारताच्या सशस्त्र दलांनी पहलगाम हल्ल्यानंतर दोन आठवड्यानंतर कडक कारवाई करताना मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मिसाईलने हल्ला केला. यात दहशतवादी लष्कर-ए-मोहम्मदचा गड बहावलपूरचाही समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने रात्री उशिरा १.४४ वाजता एका विधानात म्हटले की लष्कराने हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -