Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीOperation Sindoor: सेलिब्रेटींनी दिल्या 'भारत माता की जय' च्या घोषणा, सैन्याच्या कामगिरीला...

Operation Sindoor: सेलिब्रेटींनी दिल्या ‘भारत माता की जय’ च्या घोषणा, सैन्याच्या कामगिरीला केला सलाम

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर दिले आहे. मंगळवारी रात्री भारताकडून पाकिस्तानात मोठा एअरस्ट्राईक करण्यात आला. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओके स्थित एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक करण्यात आला.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई भारताकडून करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाचे ३ आणि हिजब्बुल मुजाहिदीच्या २ दहशतवादी ठिकाणांना यावेळी लक्ष्य करण्यात आले. ही कारवाई भारताचे लष्कर, हवाईदल आणि नौदलाने एकत्रितरित्या केली.

ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूडकरांची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरला देशवासियांनी पाठिंबा देताना भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला आहे. भारताच्या बॉलिवूड कलाकारांनी भारतीय लष्कराने केलेल्या एअरस्ट्राईकबद्दल विधान केले आहे. सगळ्यांनी जय हिंद अशा घोषणा करत आपल्या भारतीय लष्कराला सलाम केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने एक्सवर लिहिले, जय हिंद की सेना…भारत माता की जय.

 

सिनेनिर्मात मधुर भांडारकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी लिहिले, आमच्या प्रार्थना सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद वंदे मातरम…

 

अभिनेत्री निमरत कौरने इन्स्टावर ऑपरेशनर सिंदूवर प्रतिक्रिया देताना म्हटले, आम्ही लष्करासोबत आहोत. आमचा देश, एक मिशन, जय हिंद,

परेश रावल, अनुपम खेर, विनीत कुमार सिंह आणि राहुल वैद्य यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -