मुंबई : मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. याचबरोबर राज्यातील इतर भागातही सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
https://prahaar.in/2025/05/07/tourists-soul-now-truly-at-peace-family-in-dombivli-thanks-indian-army/
दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला असून त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.