मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज ५७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला २ विकेटनी हरवले. केकेआरने चेन्नईसमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान २ विकेट राखत पूर्ण केले.
केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईच्या संघाने ८ बाद १८३ धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. रहाणेने ३३ बॉलमध्ये ४ चौकार आणि दोन षटकार ठोकले. आंद्रे रसेलनेही ४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २१ बॉलमध्ये ३८ धावांची जबरदस्त खेळी केली.
तर अनुभवी फलंदाज मनीष पांडेने नाबाद ३६ आणि सलामी फलंदाज सुनील नरेनने २६ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्सकडून स्पिनर नूर अहदमने सर्वाधिक चार विकेट मिळवल्या.