Thursday, May 8, 2025
HomeदेशIndia attack pakistan: १०० किमी आत घुसून मारले...५४ वर्षांनी तीन्ही दलांनी मिळून...

India attack pakistan: १०० किमी आत घुसून मारले…५४ वर्षांनी तीन्ही दलांनी मिळून केली पाकिस्तानवर कारवाई

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तीनही दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. १९७१ नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताच्या तीनही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली.

१०० किमी आत घुसून मारले

भारताने पाकिस्तान आणि पीओकेच्या ज्या ९ ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला त्यात काही आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर स्थित आहेत. खासकरून बहावलूपर जो एकेकाळी जैश-ए-मोहम्मदचा गढ मानला जात होता हे ठिकाण १०० किमी दूर आहे. तर मुरीदके ३० किमी आणि गुलपूर ३५ किमी आत आहे.

दहशतवादी ठिकाणांवर थेट हल्ला

या ऑपरेशनमध्ये एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात आले. यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदके येथील ठिकाणांचा समावेश आहे. सैन्याच्या मते, याच ठिकाणी भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवण्यात आली होती आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आले.

कसा झाला हल्ला?

तीनही दलांनी या ऑपरेशनमध्ये आपल्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. खासकरून Loitering Ammunitionचा उपयोग झाला जे सरळ शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करतात. तसेच तिथेच ब्लास्ट करतात.

संयमी मात्र कडक कारवाई

भारतीय लष्कराने हे ही म्हटले की हे ऑपरेशन पूर्णपणे संयमी, योग्य पद्धतीचे होते. भारताने टार्गेट निवडीचे काम अतिशय विचारपूर्वक केले तसेच दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला. हे पाऊल पहलगाम हल्ल्यानंतर उचलण्यात आले.

पंतप्रधान मोदी आणि NSA डोवाल यांनी सांभाळली कमान

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण रात्रभर या ऑपरेशनवर लक्ष ठेवले. ऑपरेशन पूर्ण होताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना संपूर्ण माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -