शिर्डी : प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत अवैध गुटख्याचा साठा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त कारवाईत तब्बल ३,७५,००० किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गणेशवाडी परिसरातील आनंद निवास या ठिकाणी करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद निवास येथे धाड टाकली असता, एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि संबंधित साहित्य आढळून आला. या साठ्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या पॅकेट्सचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ३.७५ लाखांवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
https://prahaar.in/2025/05/07/scalp-missiles-worth-rs-8-crore-hammer-bombs-worth-rs-84-lakh-these-deadly-weapons-were-used-in-operation-sindoor/
गुटखा विक्री आणि साठवणूक महाराष्ट्रात पूर्णतः बंद असूनही, इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी गुटखा साठवण्यात आल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शिर्डी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष पंचनामा केला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात अन्न सुरक्षा कायदा आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुटख्याचा साठा कुठून आला आणि तो कुणासाठी ठेवण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.
शहरातील श्रद्धाळूंच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळणं ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…
पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…