जळगाव : गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या सोने आणि चांदी दरात आता पुन्हा वाढ होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी दरात मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याचा तोळा पुन्हा एकदा जीएसटीसह लाखाच्यावर गेल्यामुळे खरेदीदरांची चिंता वाढली आहे.
जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सोने १४०० रुपयांनी वाढून ९७, २०० रुपये तोळ्यावर (जीएसटीसह १,००,११६) पोहोचले. सोन्याने यंदा तिसऱ्यांदा एक लाखांचा टप्पा पार केला आहे. तर चांदीच्या दरात २ हजारांनी वाढ होऊन किलोमागे दर ९७,००० (जीएसटीसह ९९,९१०) वर पोहोचले.
दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर १४०० रुपयांनी वाढले. यामुळे गेल्या दोन दिवसात जळगावात सोने दरात ३२०० रुपयांनी वाढले आहे.