Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडी'या' ७ गोष्टी खा, नाहीतर दात पडतील, हाडं तुटतील?

‘या’ ७ गोष्टी खा, नाहीतर दात पडतील, हाडं तुटतील?

मुंबई : कॅल्शिअम हाडं आणि दातांना मजबूत करण्यासाठी फार गरजेचे असते. आपल्याला दर दिवसाला किमान १००० मिलीग्राम कॅल्शिअमची गरज असते. पण पाहिजे तेवढे कॅल्शिअम न मिळाल्याने आपली हाडं आणि दात कमजोर होऊ शकतात, त्यामुळे थकवा येणे आणि मासपेशींमध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोकांना गंभीर आजारही होऊ शकतात. काही लोकांना ऑस्टियोपोरोसिस तर लहान मुलांमध्ये रिकेट्स सारखे आजार होण्याची शक्यता असते. हे आजार आपल्याला कसे टाळता येतील व आपल्या मधील कॅलशिअमची कमी कशी दूर करता येईल हे जाणून घेऊया…

१. गाय – म्हशीचे दूध

डेरी पदार्थ हे आपल्या कॅल्शिअमसाठी चांगले स्रोत म्हणून बघितले जातात कारण डेरी पदार्थ आपल्याला पचायला सोप्पे असतात. गाय – म्हशीच्या (२५०ml) दुधामधून सुद्धा आपल्याला ३०० मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळते.

२. गुळ आणि तीळ

२० ग्रॅम गुळ खाल्याने आपल्याला ४०-५० ग्राम एवढे कॅल्शिअम मिळते, तर तीळ आणि गुळ एकत्र खाल्याने कॅल्शिअममध्ये खूप चांगला प्रभाव पडतो.

३. चणे आणि कडधान्य

१०० ग्रॅम चण्यांमधून आपल्याला १०५ मिलीग्रॅम, तसेच (१०० ग्रॅम) सोयाबीन मधून आपल्याला २०० मिलीग्रॅम आणि राजमा, मूग, चवळीमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला कॅल्शिअम मिळते.

४. बाजरी

१०० ग्रॅम बाजरी मधून आपल्याला ४२ मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळू शकते. बाजरी गरम असल्या कारणाने थंडीच्या दिवसात बाजरी शरीराला गर्मी आणि हाडांना मजबूत बनवते.

५. तीळ

१ चमचा तिळामध्ये ८८ मिलीग्रॅम कॅल्शिअम आपल्याला मिळते. हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळ शरीरासाठी लाभदायक मानले जातात.

६. लाल माट

१०० ग्रॅम लाल माटाच्या भाजीमध्ये आपल्याला २१५ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. त्याच बरोबर शेवग्यांच्या पानांपासून ४४० मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला मिळते.

७. नाचणी

१०० ग्रॅम नाचणीमध्ये आपल्याला ३४४ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. हे कॅल्शियम साठी सर्वात पौष्टिक धान्यांपैकी एक आहे आणि ह्याचा उपयोग दक्षिण भारतामध्ये जास्त केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -