श्रीनगर : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. पाकिस्तानने सलग बाराव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय चौकी – पहारे यांना लक्ष्य करत गोळीबार केला. पाकिस्तानच्या कृत्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
भारत सरकारने सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये मजबूत बंकर बांधण्यासाठी मदत दिली आहे. यामुळे ग्रामस्थ गोळीबार सुरू होताच बंकरमध्ये राहून स्वतःचे आणि नातलगांचे रक्षण करत आहेत. पाकिस्तानच्या सततच्या गोळीबारामुळे दररोज अनेक तास ग्रामस्थांना बंकरमध्ये थांबावे लागत आहे.
पाकिस्तानने बाराव्या रात्री हलक्या वजनाची आधुनिक लहान शस्त्रे वापरुन गोळीबार केला. कुपवाडा, बारामुला, पूँछ, राजौरी, मेंढर , नौशेरा, सुंदरबनी, अखनूरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. भारताने लगेच चोख प्रत्युत्तर दिले.
पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान दोन वेळा डीजीएमओ पातळीवर चर्चा झाली होती. आता मंगळवार ६ मे रोजी सकाळी अकरा वाजता तिसऱ्यांदा भारत – पाकिस्तान दरम्यान डीजीएमओ पातळीवर चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही बाजूचे ब्रिगेडिअर दर्जाचे अधिकारी चर्चा करणार आहेत.
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. भारताने सिंधू आणि चिनाब या दोन नद्यांचे पाणी भारतीय प्रकल्पांसाठी वळविण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. भारत – पाकिस्तान व्यापार बंद करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी – कर्मचारी यांची संख्या कमी करण्यात आली आहे. भारत – पाकिस्तान दरम्यानची टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना बुधवार ७ मे २०२५ रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. सायरन वाजवून चाचणी घ्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सक्रिय करुन त्याच्याशी संबंधित प्रशिक्षण नागरिकांना देणे, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी मूलभूत नागरी संरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण देणे, काळोखात अर्थात ब्लॅकआऊटमध्ये कामकाज करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करणे, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करणे, हल्ला झाल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची व्यवस्था करणे या सर्वांचे नियोजन सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…