Wednesday, May 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमिठी प्रकल्पात ६५ कोटींचा अपहार; बीएमसीचे ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३...

मिठी प्रकल्पात ६५ कोटींचा अपहार; बीएमसीचे ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

१००० कोटींचा संशयित घोटाळा

मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठा घोटाळा उघड झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

या आरोपींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला तब्बल ६५.५४ कोटींचा आर्थिक फटका दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एकूण घोटाळा १००० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.

आज सकाळपासून विशेष तपास पथकाने मुंबईतील ८–९ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे घर व कार्यालये तपासली जात आहेत. विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासावर आधारित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://prahaar.in/2025/05/06/rakhi-sawant-should-be-expelled-from-the-country-mns-demands/

या कारवाईत कै. काशिवाल (कैलाश कन्स्ट्रक्शन), ऋषभ जैन (अक्युट एन्टरप्रायझेस), आणि शेरसिंह (मंदीप एन्टरप्रायझेस) या तीन ठेकेदारांना समन्स बजावण्यात आले आहेत.

२००५ पासून सुरू असलेल्या १७.८ किमी लांब मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पावर १३०० कोटी खर्च करण्यात आले. या पैशांचा उपयोग खरोखर झाला का, की तो खोट्या करारपत्रांच्या आधारे अपहार केला गेला, हे तपासण्यात येत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त व्ही. डी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक चौकशी करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -