Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीKiara Advani : बेबी बंपसह कियाराची मेट गालामध्ये धमाकेदार एन्ट्री, बाळासाठी तयार...

Kiara Advani : बेबी बंपसह कियाराची मेट गालामध्ये धमाकेदार एन्ट्री, बाळासाठी तयार केला खास ड्रेस

मुंबई :अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात झालेल्या मेट गाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने तिचे पदार्पण केले आहे. कियारा गरोदर असून तिला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली आहे. या शोमध्ये तिने सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मेट कार्पेटवर आपले सौंदर्य खुलवले. सोनेरी नक्षीकाम केलेल्या तिच्या काळ्या ड्रेसवर आणि लांब पांढऱ्या ट्रेलवर बाळासाठी एक लहान हृदयाच्या आकाराची प्लेट होती. जी त्या ड्रेसमध्ये लक्ष वेधून घेत होती.

मेट गाला हे फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी एक आहे. हा सोहळा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी (ET) आयोजित केला जातो. या वर्षी शाहरुख खान आणि दिलजीत दोसांझ सारखे भारतीय स्टार मेटमध्ये पदार्पण करत आहेत. प्रियांका चोप्रा जोनास हीचे मेट गालाचे हे पाचवे वर्ष आहे.

https://prahaar.in/2025/05/06/increase-in-fire-incidents-due-to-rising-temperatures/

मेट गालामध्ये कियारा आडवाणी

गरोदर असलेल्या कियाराने रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू कायम ठेवली. “ब्रेव्हहार्ट्स” असे तिच्या ड्रेसचे नाव होते, जो फॅशनपेक्षा खूप काही होता – तो स्त्रीत्व, वंश आणि परिवर्तनाला दर्शवित होता. एकदम कलात्कमरित्या बनवलेल्या गाऊनमध्ये घुंगरू आणि स्फटिकांनी सजवलेला सोनेरी पट्ट्या होत्या. दोन हृदये – एक आईचे आणि एक बाळाचे, तसेच नाभीसंबधीच्या दोरीला जोडलेली साखळी, जी तिच्या मातृत्वाचे प्रतीक आहे असे पाहायला मिळत होते.

मेट गाला लूकसह आई होण्याचा आनंद

मेट गालामधील तिच्या पदार्पणाबद्दल बोलताना कियारा आडवाणी म्हणाली, “एक कलाकार आणि आई म्हणून, सध्या मेट गालामध्ये पदार्पण करणे माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा माझी स्टायलिस्ट अनैताने माझा लूक डिझाइन करण्यासाठी गौरवशी संपर्क साधला तेव्हा त्याने ‘ब्रेव्हहार्ट्स’ तयार केले, हा माझ्यातल्या त्या बदलांचा सन्मान आहे ज्यात मी प्रवेश करत आहे.”

कियाराने डिझाइन केले

“हे या वर्षीच्या ड्रेस कोड ‘टेलर्ड फॉर यू’ शी सुंदरपणे जुळते,” ती पुढे म्हणाली. एंड्रे लिओन टॅलीच्या वारशाने प्रेरित होऊन, आम्ही ते कसे तयार करावे याचा विचार केला. ही त्यांना मूक श्रद्धांजली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -