नवी दिल्ली : एकेकाळी विकसनशील देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता जागतिक आर्थिक महासत्तांमध्ये आपली ठाम जागा निर्माण करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपली नोंद केली आहे.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात भारताचा एकूण देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपी तब्बल ४.१८७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला आहे. या तुलनेत जपानची जीडीपी ४.१८६ ट्रिलियन डॉलर्स इतकी असून, अगदी थोड्याच फरकाने भारताने ही आघाडी घेतली आहे. हे केवळ क्रमवारीतील बदल नसून, भारताच्या आर्थिक प्रगतीचा हा एक ऐतिहासिक टप्पा ठरतो.
https://prahaar.in/2025/05/06/ed-finds-former-congress-mla-in-five-star-hotel-in-delhi/
सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असून तिची जीडीपी ३०.५०७ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. त्यापाठोपाठ चीन १९.२३१ ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीची जीडीपी ४.७४४ ट्रिलियन डॉलर्स असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून जपान पाचव्या स्थानी सरकला आहे.
IMF च्या अंदाजानुसार, भारत येत्या दोन वर्षांत ६ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढणारी एकमेव मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे. याउलट जपानमध्ये २०२५ आणि २०२६ दरम्यान फक्त ०.६ टक्के इतकीच मर्यादित आर्थिक वाढ अपेक्षित आहे. जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या मंदीचा परिणाम जपानच्या निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेवर झाल्याने ही मर्यादा निर्माण झाली आहे.
भारताच्या या घोडदौडीमागे अनेक महत्त्वाचे घटक आहेत. गेल्या काही वर्षांत उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या योजना, डिजिटल परिवर्तन, तरुण कार्यशक्तीचा प्रभावी उपयोग, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीसाठी सुलभ धोरणं, आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास यामुळे भारताची आर्थिक गती प्रचंड वाढली आहे.
अमेरिका – $30.507 ट्रिलियन
चीन – $19.231 ट्रिलियन
जर्मनी – $4.744 ट्रिलियन
भारत – $4.187 ट्रिलियन
जपान – $4.186 ट्रिलियन
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२८ पर्यंत भारताची जीडीपी ५.५८४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर भारत जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल.
ही प्रगती केवळ आर्थिक आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर जागतिक राजकारणात भारताची पत आणि भूमिका अधिक बळकट होण्याची ही नांदी आहे. आर्थिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर भारत ठामपणे वाटचाल करत आहे, हे या घडामोडींमधून स्पष्टपणे दिसून येते.
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…