नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने १९ माजी राज्यमंत्र्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांचा कार्यकाळ संपल्यामुळे गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना माजी राज्यमंत्र्यांची सुरक्षा काढण्याचे निर्देश दिले आहे.
नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदीय किंवा धमकीच्या आधारावर प्रदान केलेल्या सुरक्षेचे पुनरावलोकन केले जाते. मात्र पुनरावलोकन बराच काळ घेण्यात आले नव्हते. मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गृहमंत्रालयाला त्यांच्या शिफारसी पाठवल्या.
गृहमंत्रालयाचा अंतिम निर्णय काही आठवड्यांपूर्वी आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह आणि राज्यमंत्री अजय भट्ट यांची नावे देखील गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली होती, परंतु त्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, गृहमंत्रालयाने स्मृती इराणी यांची सुरक्षा आणखी ६ महिन्यांसाठी वाढवली आहे.
कार्यकाळ संपल्यानंतरही ज्या माजी राज्यमंत्र्यांना सुरक्षा दिली जात होती अशांची यादी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाला पाठवली होती. पोलिसांच्या युनिटने ऑडिट केल्यानंतर या सुरक्षेचे पुनरावलोकन करण्याची विनंती गृहमंत्रालयाला केली होती. पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांना वाय-श्रेणी सुरक्षा कवच देण्यात आले आहे, त्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील माजी राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा, पंचायती राजचे माजी मंत्री बिरेंदर सिंग, दळणवळणाचे माजी राज्यमंत्री देवुसिंह जेसिंगभाई चौहान, आदिवासी व्यवहाराचे माजी राज्यमंत्री जसवंतसिंह सुमनभाई भाभोर आणि परराष्ट्र व्यवहाराचे माजी राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्याव्यतिरिक्त गृहमंत्रालयाच्या यादीत काही खासदार आणि वरिष्ठ न्यायाधीशांची नावे देखील समाविष्ट आहेत. काही न्यायाधीशांसाठी सुरक्षा कायम ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…