Thursday, May 8, 2025
Homeक्राईम‘ऑपरेशन धप्पा’: दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काँग्रेसचा माजी आमदार सापडला!

‘ऑपरेशन धप्पा’: दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काँग्रेसचा माजी आमदार सापडला!

ईडीच्या छाप्यात ५०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश!

गंगेत डुबकी घेत असताना मुलगाही अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील कनॉट प्लेस भागात स्थित अशोका रोडवरील पाचतारांकित शांगरी-ला हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पण कोणालाही कल्पना नव्हती की, याच हॉटेलमध्ये प्रवर्तन संचालनालय (ED) एक धडकी भरवणारी कारवाई करणार आहे. ही कारवाई होती ‘ऑपरेशन धप्पा’, ज्यात ५०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी हरियाणाचे माजी आमदार धर्म सिंह छोकर यांना अटक करण्यात आली.

कोण आहेत धर्म सिंह छोकर?

धर्म सिंह छोकर हे हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील समालखा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलगा सिकंदर सिंहवर आरोप आहे की, त्यांनी ‘दीन दयाळ आवास योजना’च्या नावाखाली १५०० लोकांना घरं देण्याचं आमिष दाखवून सुमारे ५०० कोटी रुपये उकळले.

या प्रकरणात साई आइना फार्म्स प्रा. लि. आणि महिंद्रा होम्स या दोन कंपन्यांचा सहभाग आहे, ज्या छोकर वडील-मुलाच्या ताब्यातील होत्या.

https://prahaar.in/2025/05/03/thrilling-murder-in-malad-mumbai-shaken-by-machhamach-case/

ऑपरेशन ‘धप्पा’ कसं राबवलं गेलं?

ईडीने धर्म सिंह आणि त्यांच्या मुलाला अनेकदा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून गैरजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. परंतू धर्म सिंह हे सापडत नव्हते.

शेवटी ईडीच्या गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्म सिंह हे दिल्लीच्या शांगरी-ला हॉटेलमध्ये थांबलेले असल्याचं समजलं. तेव्हा विशेष पथक तयार करण्यात आलं आणि एक गुप्त छापामारीची मोहीम राबवण्यात आली, ऑपरेशन धप्पा!

ईडीने हॉटेलमध्ये दबक्या पावलांनी प्रवेश करत धर्म सिंह यांना गुप्तपणे अटक केली.

हरिद्वारमध्ये गंगेत डुबकी घेणारा मुलगाही अटकेत

धर्म सिंह यांचा मुलगा सिकंदर हा त्या वेळी हरिद्वारमध्ये धार्मिक विधीसाठी गंगेत डुबकी घेण्याच्या तयारीत होता. पण ईडीचं जाळं त्याच्यावरही होतं आणि त्यालाही तिथेच अटक करण्यात आली.

१५०० लोकांची फसवणूक… आणि कोण कोण दोषी?

दीन दयाळ आवास योजना अंतर्गत लोकांना परवडणारी घरे देण्याचं वचन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात लाखो रुपये उकळून कोणालाही घरं मिळाली नाहीत.

ईडी सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत असून अजूनही काही राजकीय व्यक्ती, बिल्डर आणि आर्थिक गुन्हेगारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत

लोकांचे ५०० कोटी गेले कुठे?

या फसवणुकीच्या जाळ्यात अजून किती बडी माणसं सामील आहेत?

आणि पीडितांना न्याय कधी मिळणार?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -