Wednesday, May 7, 2025
Homeताज्या घडामोडीBSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

BSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुन्हा आपल्या नव्या प्लानमुळे चर्चेत आहे. येथे जिओ, एअरटेल आणि व्हीआयसारख्या खाजगी कंपन्या दर महिन्याला महागडे रिचार्ज प्लान्स सादर कत आहेत तर बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा बजेट प्लान चांगली सर्व्हिस देत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण १८० दिवसांची आहे.

सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा प्रीपेड प्लान त्या युजर्ससाठी परफेक्त आहे ज्यांना सतत रिचार्ज करायते नसते. या प्लानमध्ये संपूर्ण १८० दिवसांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट संपते. तसेच युजर्स अगदी सहज मोबाईलचा वापर करू शकतात.

Airtel चा नवा प्लान

एअरटेलने नवीन प्लान आणला आहे याची किंमत ४ हजार रूपये आहे. यात युजर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटांपर्यंत इनकमिंग तसेच आऊटगोईंग कॉलची सुविधा मिळते. भारतात याचे फायदे पाहिल्यास एका वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -