नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यानचा महत्त्वाकांक्षी व परस्पर हिताचा Free Trade Agreement (FTA) अखेर पूर्ण झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूकेचे नविन पंतप्रधान कीअर स्टार्मर (Keir Starmer) यांनी याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून गौरव केला आहे.
पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले, “माझ्या मित्र PM @Keir_Starmer यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. भारत-यूकेने महत्त्वाकांक्षी आणि परस्पर हिताचा मुक्त व्यापार करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचबरोबर डबल कॉन्ट्रिब्युशन कन्वेन्शनलाही अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.”
https://prahaar.in/2025/05/06/indias-historic-leap-india-surpasses-japan-to-rank-fourth/
या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, नवोपक्रम व नावीन्य यांना चालना मिळेल. Comprehensive Strategic Partnership अजून मजबूत होईल आणि नव्या संधी खुल्या होतील, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे.
कीअर स्टार्मर यांनी नमूद केलं की, “जगभरातील अर्थव्यवस्थांशी व्यापार अडथळे कमी करून भागीदारी वाढवणं हेच आमच्या ‘Plan for Change’ चं मुख्य उद्दिष्ट आहे.”
या मुक्त व्यापार करारामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश आहे आणि तो नवीन रोजगार निर्मिती, उच्च जीवनमान, आणि उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांना लवकरच भारतभेटीस येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…