डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक जण काम उद्योग-धंद्यासाठी कल्याण शीळ रोडचा जा-ये वापर करावा लागतो कारण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र या वाहतूक कोंडीला जबाबदार असलेली बेकायदेशीर बांधकाम, ती हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा व महापालिकेने २०१५ ते २०२५ या वर्षात काही उपाययोजना केल्या आहेत का या विषयावर माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत हे नाही किंवा पाठपुरावा ही केला नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
https://prahaar.in/2025/05/05/cleaning-the-dadar-dharavi-drain-or-throwing-dust-in-the-eyes/
कल्याण शीळ रोड पूर्वी दोन पदरी होता त्याचा चारपदरी झाला आतातर तो सहापदरी होऊन ही वाहतूक कोंडी मात्र न सुटता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या आता मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे जागोजागी मेट्रोचे आवर अवाढव्य खांब उभारण्यात येत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.ती कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हतबल आहेत. दुसरे असे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना दंड वसूल करण्यासाठी कोटा पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते.
या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मनसे सरसावली असून त्याविषयी माहिती देताना मनसे पदाधिकारी अरुण जांबळे म्हणाले की आंदोलन करण्यात आले होते आता याविषयावर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत. रस्ते विकासासाठी आड येत असलेली बांधकामे पण ती तोडू नये ही त्यासाठी राजकीय दबाव येत आहे. सकाळच्या वेळी मुंबईकडे जाताना व सायंकाळी डोंबिवली-कल्याणकडे परत येताना अनेक वेळ वाहतूक कोंडी होते.काही वेळा तर तासंतास होते. या साठी वाहतूक नियंत्रण शाखेत कर्मचारी कमी आहेत असे उत्तर दिले जात आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने शासनाने बघणे जरूरीचे आहे मंत्री महोदय येतात तेव्हा वाहतूक कोंडी का होत नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…