मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो लवकरच धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु असून या मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरात लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शनिवारपासून या मेट्रो मार्गिकेवर विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित केला जाणार आहे. या मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार असून यामुळं विरार लोकलमधील गर्दीदेखील कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी, १० मे रोजी दहिसर ते काशीगावदरम्यान मार्गिकेवरील विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित केला जाणार आहे. हा विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर ४-५ दिवसांत या मार्गिकेवर मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता लवकरच दहिसर ते काशीगावदरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे.
https://prahaar.in/2025/05/05/mumbais-matka-queen-in-trouble-again-found-in-goa-was-running-a-gambling-empire-even-after-her-husbands-murder/
एमएमआरडीएकडून दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी १३.६ किमी असून १० स्थानके असणार आहे. मात्र एकूण मार्गिकेपैकी पहिला ४.५ किमीपर्यंतचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. दहिसर ते काशीगावपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. तर, डिसेंबरच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी ६,६०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात चार स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव अशी स्थानके आहेत. MRDकडून गाडीच्या चाचण्यांसह वजनासह चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा आणि ट्रॅक्शनच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर विविध यंत्रणांकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दहिसर ते काशीगाव मेट्रो ९ मार्गिकेवर असा पहिला टप्पा असणार आहे. तर, काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. या मेट्रोमुळं दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ही मेट्रो वेस्टन एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे आणि सध्या सुरू असलेली मेट्रो २ ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो मार्ग अंधेरी (ई) ते दहिसर (ई) पर्यंत संपर्क प्रदान करेल. म्हणजेच मेट्रो ९ थेट लोकलला थेट कनेक्ट होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.
१. दहिसर
२. पांडुरंग वाडी
३. मिरागाव
४. काशीगाव,
५. साई बाबा नगर’
६. मेदितिया नगर
७. शहीद भगतसिंग गार्डन
८. सुभाषचंद्र बोस स्टेडियम
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…