हास्यजत्रा फेम दत्तू मोरे झाला बाबा, शेअर केला परफेक्ट ‘फॅमिली फोटो’

Share

लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तो एका गोंडस मुलाचा बाबा झाला आहे. स्वतः दत्तू मोरेनं इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली.

अभिनेता दत्तू मोरेला मुलगा झाला असून त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. दत्तूने इन्स्टाग्रामवर परफेक्ट ‘फॅमिली फोटो’ शेअर करुन बाळाची हलकी झलकही दाखवली आहे.  त्याच्या या फोटोंखाली चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोशल मिडियावर शेअर केले फोटो

दत्तूनं आपल्या इन्स्टाग्रामवर सुरुवातीला दत्तू आणि त्याच्या बायकोचे प्रेग्नेंसी शूट दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, या फोटोंसोबत दत्तूनं आपल्या गोंडस बाळाचे दोन सुंदर फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

 

परफेक्ट फॅमिली फोटो

दत्तू मोरेनं आपल्या चिमुकल्यासोबतचा गोंडस फोटो शेअर करुन त्याखाली सुंदर कॅप्शनही दिलं आहे. त्यानं लिहिलंय की, “फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण… मी सदैव कृतज्ञ आहे.” दत्तू मोरेच्या या पोस्टवर त्याच्या सहकलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

2023 मध्ये बांधली लग्नगाठ

दत्तू मोरेनं 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. दत्तूची पत्नी स्वाती घुनागे पेशानं डॉक्टर असून ती स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.  स्वाती दत्तूच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधलं स्कीट पाहायची, त्याबद्दल तिनं त्याला फेसबुकवर मेसेजसुद्धा केलेले. पुढे या दोघांमध्ये मैत्री झाली, आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

4 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

17 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago