Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीगाळे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

गाळे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

२० मे पर्यंत संबंधित अर्जदारांनी अर्ज करण्याचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या मूळ भाडेकरु/रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांच्याकडून दि. २० मे, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत बृहतसूचीवरून पात्रता निश्चित करून गाळे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदाराची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता masterlist.mhada.gov. in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील म्हाडा MHADA ज्या भाडेकरू / रहिवासी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत; परंतु कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मूळ भाडेकरू / रहिवासी यांना यापूर्वी आवश्यक आहे. अर्जदाराचा रंगीत फोटो, अर्जदाराचे हस्ताक्षर किंवा अंगठ्याचा ठसा आदीचा फोटो, आधार कार्ड, व्हेकेशन नोटीस, जुन्या इमारतीतील गाळ्यांची भाडेपावती, विद्युत देयक, संक्रमण शिबिरातील गाळ्याचे वितरण आदेश व ताबा पावती, हस्तांतरण करारनामा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

मंडळाद्वारे पुनर्रचित / पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरुपी गाळ्य देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात स्वतः अधिवास धारण करीत आहेत. अशा बृहतसुचीवरील खऱ्या खुऱ्या मूळ भाडेकरू/रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांच्यासाठी सदर ऑनलाइन अर्ज प्रकिया राबविण्यात येत आहे. नोंदणी करते वेळी अर्जदाराचा वैध मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता असणे यापूर्वी बृहतसूवी समितीने पात्र घोषित केलेल्या अर्जदारांनी नव्याने अर्ज दाखल करू नये. तसेच ज्या अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल केला आहे, अशा अर्जदारांनी पुनश्च नव्याने अर्ज दाखल करू नये. तथापि, ज्यांनी यापुर्वी बृहतसुचीकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे; परंतु त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

अर्ज यशस्वीरीत्या Submit केल्यानंतर, अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाईन सादर केलेले कागदपत्र ३० दिवसांच्या कालावधीत कक्ष क्र. २७२, दुसरा मजला, म्हाडा मुख्यालय, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रि पूर्व, मुंबई-५१ येथे सादर करावेत. सुनावणीच्या वेळेस अर्जदाराने सर्व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्यासंबंधीत कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. अर्जदाराची पात्रता व पुनर्रचित पुनर्विकसित गाळपाचे वितरण याबाबत म्हाडा अधिनियम १९७६ व विनियम १९८१ तसेच शासनाचे व म्हाडाच्या नवीन धोरणातील तरतुदीमधील धोरणानुसार गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -