Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीPune News : पुणेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

Pune News : पुणेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना (Pune News) भेडसावत असलेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. शहरातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली, तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र त्यानंतर चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Pune Unseasonal Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून (Meteorological Department) ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

https://prahaar.in/2025/05/04/will-melghat-safari-become-more-expensive-safari-closed-for-3-days-due-to-demand-for-fare-hike/

पुणे आणि परिसरात आकाशामध्ये ढगांची सतत वर्दळ होती. काही वेळा सूर्य ढगांच्या आड लपला होता, त्यामुळे दिवसभर हवामानात एक प्रकारची दमट आणि गडद छाया जाणवत होती. शहरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कमाल तापमानात झालेली ही घसरण पुणेकरांसाठी सुखद ठरली. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत जाणवणारा गारवा उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला.

पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, किमान तापमानात वाढ होणार आहे. त्यानंतर मात्र पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून विजांचा कडकडाट होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. (Pune Unseasonal Rain Alert)

राज्यभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

सध्या चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रालगतच्या राजस्थान आणि मध्यप्रदेशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सागर किनारपट्टीलगतचा भाग वगळता उर्वरित राज्यात उद्या ४ मे ला वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर ५ आणि ६ मे ला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Weather Update)

दरम्यान, विदर्भातील नागपूरसह वर्धा आणि भंडारामध्ये पुढील काही तास ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर पुढील २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. यामध्ये वीजांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे. ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावणार

गत वर्षीप्रमाणे, यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे. मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक आणि मान्सून अभ्यासक डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -