Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबारावीचा निकाल सोमवारी जाहीर होणार

बारावीचा निकाल सोमवारी जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार पाच मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका डाऊनलोड करुन ठेवता येईल. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरुन निकालाची प्रिंट काढता येईल तसेच निकालाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करुन घेता येईल. निकाल ऑनलाईन उपलब्ध असला तरी महाविद्यालयात पुढील वर्षाचा प्रवेश घेण्यासाठी निकालाची अधिकृत प्रत दाखवावी लागते. यासाठी निकालाची मूळ प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात मिळणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या वेबसाईटवर स्वतः अथवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना ६ मे ते २० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking द्वारे शुल्क भरण्याची सोय आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या (answer sheet) पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत (photocopy) मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जुन-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जुन-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जे विद्यार्थी आपले गुण वाढवू इच्छितात, ते पुढील तीन परीक्षांमध्ये गुणसुधारसाठी प्रयत्न करू शकतात.

जुन-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Exam) जे विद्यार्थी पुनर्परीक्षा देणार आहेत, श्रेणी सुधार करू इच्छितात किंवा खाजगीरित्या परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ मे २०२५ पासून सुरू होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी लिंक : 

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. http://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -