मुंबई:रोजच्या नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण आहार मानतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात, ज्याचे निरीक्षण रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतारांद्वारे केले जाते.सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर रोहन सेहगल यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी बेसन पोळीसह लिंबाचे लोणचे, हिरव्या चटणीचे सेवन केले आणि त्याचा परिणाम तपासला.
बेसन पोळी खाल्ल्यानंतर काही तासांनी सहगल यांनी सांगितले की, माझ्या रक्तातील ग्लुकोज फक्त १६ मिलीग्रामने वाढले. माझ्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यासाठी फक्त १.५ तास लागला. हा परिणाम चांगला आहे, कारण बेसनमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शिवाय ते खूप चविष्टही असतात,” असे सेहगल म्हणाले.
https://prahaar.in/2025/05/03/ajanta-boat-service-suspended-weather-or-lack-of-planning/
पण काही काळापूर्वीच मेटाबॉलिक हेल्थ कोच करण सरीन यांनीही त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर एका बेसन पोळीचा (५० ग्रॅम पिठापासून बनवलेला) परिणाम तपासला.त्यांच्या मते, वाढ ४० पेक्षा जास्त होती. “ती ३० पेक्षा कमी असायला हवी होती,”असे सरीन म्हणाले.या परस्परविरोधी निकालांमुळे इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रत्यक्षात काय होते याचा शोध घेण्याचे ठरवले.
डॉ. के. हेमंत कुमार, सल्लागार म्हणाले की, ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हा एक सामान्यतः वापरला जाणारा पॅरामीटर आहे, जो विविध पदार्थ रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकतात हे मोजण्यास मदत करतो. रँकिंग ० ते १०० च्या स्केलवर आधारित आहे आणि उच्च जीआय असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पातळी जलद वाढवतात. “मधुमेह असलेल्या लोकांसाठी उच्च जीआय असलेले पदार्थ त्यांच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण बनवू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…