नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानची चारही बाजूने मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे, पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध उचललेल्या पाऊलांमध्ये सिंधू पाणी वाटप करार (Indus Waters Treaty) ) रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदी (Chenab River)चे पाणी देखील बागलीहार धरणा (Baglihar Dam) द्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे आणखीन एक पाणी भारताने पळवले आहे.
पाकिस्तान सोबतचा कित्येक वर्ष सुरू असलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदीचे पाणी देखील अडवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, हा पाकिस्तानसाठी भारताकडून आणखी एक जबरदस्त धक्का म्हणता येईल.
सिंधू करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद झाले आहे. त्यानंतर आता चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी धरणाद्वारे अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाणी नियंत्रित करण्याची क्षमता भारताकडे आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे झेलमची उपनदी नीलम नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…