Thursday, May 8, 2025
HomeदेशIndia Water Strike: सिंधू नंतर आता चिनाबचे पाणी थांबवले... पाकिस्तानच्या तोंडचे पाणी...

India Water Strike: सिंधू नंतर आता चिनाबचे पाणी थांबवले… पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानची चारही बाजूने मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे, पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध उचललेल्या पाऊलांमध्ये सिंधू पाणी वाटप करार (Indus Waters Treaty) ) रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदी (Chenab River)चे पाणी देखील बागलीहार धरणा (Baglihar Dam) द्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे आणखीन एक पाणी भारताने पळवले आहे.

पाकिस्तान सोबतचा कित्येक वर्ष सुरू असलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदीचे पाणी देखील अडवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, हा पाकिस्तानसाठी भारताकडून आणखी एक जबरदस्त धक्का म्हणता येईल.

बागलीहार धरणातून पाणी अडवले जाणार 

सिंधू करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद झाले आहे. त्यानंतर आता चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी धरणाद्वारे अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाणी नियंत्रित करण्याची क्षमता भारताकडे आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

बागलीहार प्रकल्पावरून दीर्घकालीन वाद

जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे झेलमची उपनदी नीलम नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -