वाहतुकीवर वाढणार ताण; चालकांनी नियमांचे पालन करावे
ठाणे : मुंबई, नाशिक, गुजरात मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा समजला जाणारा माजीवाडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी १९ दिवस बंद राहणार (Thane Majiwada Bridge off) आहे. पुलावरील रस्त्यावर यंत्राद्वारे मास्टिकचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई घोडबंदर मार्गीकेवर रात्रीच्या वेळेत केल्या जाणाऱ्या कामासाठी हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. २२ मे पर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या पुलावरील वाहतुकीचा ताण पुलाखालील वाहतुकीला बसणार आहे.
https://prahaar.in/2025/05/04/dried-fish-lovers-pockets-hit-bombay-duck-dried-fish-prices-have-increased/
माजीवाडा उड्डाणपूल हा मुंबई नाशिक आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. हजारोंच्या संख्येने या अकोला वरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. पुलावरील वाहनांच्या ताणामुळे रस्त्यावरील डांबर वितळल्याने रस्तावर खाली झाला आहे. त्यामुळे पावसाळा पूर्वी रस्त्याची दुरुस्त करणे महत्त्वाचे असल्याने पुलावरील रस्त्यावरचे मास्टिक खरडून काढले जाणार आहे, हे काम मिलिंग मशीनद्वारे केले जाणार आहे.
मास्टिक खरडून काढल्यानंतर त्यावर नवे मास्टिंग केले जाणार असल्याने हा मार्ग १९ दिवस (३ ते २२ मे) वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम चालणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम करण्यात येणार असून वाहन चालकांनी नियमांचे पालन करायचे आहे असे वाहतूक विभाग उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. (Thane Majiwada Bridge off)
प्रवेश बंद
घोडबंदर मुबई मार्गावर तत्त्वज्ञान पूल चढणी पुलावरून मुंबई अथवा नाशिककडे जाण्यास प्रवेश बंद आहे. त्याचबरोबर भिवंडी-मुंबई वाहिनी बाळकुम अग्निशमन पूल चढणी येथून पुलावरून मुंबई अथवा नाशिककडे जाणारा मार्ग बंद असणार आहे.
पर्यायी मार्ग
घोडबंदर मार्गाचा वापर करणारी सर्व वाहने स्लीप रोडने कापूरबावडी सर्कल मार्गे जातील. तर भिवंडी-मुंबई वाहिनी बाळकुम अग्निशमन पुलावरून जाणारी वाहने ही स्लीप रोडने कापूरबावडी सर्कल मार्गे जातील. (Thane Majiwada Bridge off)