Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलदिनदर्शिका : कविता आणि काव्यकोडी

दिनदर्शिका : कविता आणि काव्यकोडी

महिन्यानुसार ही
बदलते पाने
रोज नव्या दिवसाचे
गाते नवे गाणे

ऑफिस, घर, शाळेत
हमखास दिसते
बारोमास भिंतीवर
लटकून बसते

वारांना जोड सांगे
सण, उत्सवांची
जयंती, पुण्यतिथी
कळे थोरामोठ्यांची

पंचांगातील सारेच
ठेवते ही मांडून
मराठी महिन्यांची
महती जाते सांगून

सूर्योदय, सूर्यास्त
पौर्णिमा, अमावस्या
सांगते राशींची
दशा आणि दिशा

कुणी म्हणती कॅलेंडर
कुणी दिनदर्शिका
अचूक तारीख, वार
पटकन सांगते बरं का!

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१)कान मोठे, तोंड छोटे
शेपटी आहे लांब
सतत कुरतडण्याची
सवय याची घाण

धान्याची नासाडी हा
फारच करत असतो
मांजराला पाहून कोण
बिळात जाऊन बसतो?

२)लवचिक शरीर, तीक्ष्ण नखे
अंगावर केस खूप
पाळीव प्राणी म्हणून
प्रसिद्ध तिचे रूप

म्याँव म्याँव करून
घरभर बसते खेळत
उंदराच्या मागे मागे
कोण असते पळत?

३) नदी, पाण्यात डुबणारी
दलदलीत लोळणारी
कधी शिंगे उगारून
शत्रूमागे पळणारी

कोळशासारखा रंग काळा
शरीर मजबूत तिचे
दूध देते भरपूर
नाव काय हिचे?

उत्तर –
१)उंदीर
२)मांजर
३) म्हैस

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -