अमृतसर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानसोबत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडण्यात आले आहे. हे गुप्तहेर (Pakistani Spies) भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेस संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत होते.
अमृतसरमधील बल्हाडवाल येथे राहत असलेला पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांना अजनाला पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आयएसआयला माहिती देण्याच्या बदल्यात, पाकिस्तान गुप्तचर संघटना या दोघांच्या बँक खात्यात पैसे जमा करत असे. त्यामुळे या दोघांविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट, बीएनएस कलम ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करत होते आणि अमृतसरमधील सैन्याच्या हालचाली आणि एअरबेसशी संबंधित माहिती मोबाईलवरील फोटो आणि व्हिडिओद्वारे पाकिस्तानला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता. त्यांच्या इतर संपर्कांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांनी आयएसआयला कोणती माहिती शेअर केली आहे हे शोधण्यासाठी पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे अमृतसर पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या आयएसआय एजंट्सकडून आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसबद्दल माहिती असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. तसेच काही छायाचित्रे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातून व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तर आयात-निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…