Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीPune Accident : पुण्यात नेमकं चाललंय काय! नवले पुलावर एकाचदिवशी तीन अपघात;...

Pune Accident : पुण्यात नेमकं चाललंय काय! नवले पुलावर एकाचदिवशी तीन अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सातत्याने अपघात घडल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुणे शहराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत. पुणे शहरातील नवले पूल परिसरात अपघाताचं सत्र (Pune Navale Bridge Accident) पाहायला मिळालं आहे. एकाच दिवशी लागोपाठ तीन मोठे अपघात घडले असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. पुण्यात अपघाताची मालिका सुरु असून नवले पूल परिसरात प्रवास करताना पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://prahaar.in/2025/05/03/next-4-days-are-important-warning-of-unseasonal-rains-with-gusty-winds/

मद्यधुंद नशेत गाडी चालवून भीषण अपघात

पुण्यातील नवले पूल परिसरात आज पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अपघात घडला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

शनिवारी दुपारी अडीच वाजता एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकची तीन वाहनांना जोरदार धडक बसली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये दुकाचीस्वार सरळ ट्रकच्या टायरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

अवजड वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अवजड वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नवले पुलाजवळ गाडी येताच ही घटना घडली. या घटनेचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -