बंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध सीएसके (RCB Vs CSK) अशी लढत रंगणार आहे. आयपीएलच्या (IPL 2025) या सामन्यात साऱ्यांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) च्या विराट खेळीकडे असणार आहेत. कारण या सामन्यात विराट कोहलीला एक किंवा दोन नव्हे तर तब्बल ५ वेगवेगळे विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराट कोहली शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाकडून आयपीएल २०२५ मध्ये अव्वल स्थान आणि प्लेऑफ पात्रता मिळवण्याच्या ध्येयाने मैदानात उतरेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध होणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात आरसीबीने पहिल्या हंगामानंतर पहिल्यांदाच चेपॉक येथे सीएसकेचा पराभव केला आहे. त्या सामन्यात आरसीबीने ५० धावांनी सीएसके विरुद्ध विजय मिळवला होता.
आरसीबी १० सामन्यांत १४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, नेट रन-रेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या मागे आहे. या हंगामात आरसीबीतून खेळत असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत कमाल कामगिरी करून दाखवली आहे.
या हंगामात विराट कोहलीने आतापर्यंत ४४७ धावा केल्या असून, तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच सीएसकेविरुद्ध सामन्यात कोहलीला एक किंवा दोन नव्हे तर पाच वेगवेगळे विक्रम मोडण्याची संधी असेल.
आरसीबीचा शेवटचा सामना २०२४ च्या आयपीएलमध्ये बेंगळुरूमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाला होता, त्या सामन्यांत आरसीबीने २७ धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
शनिवारी होत असलेल्या RCB विरुद्ध CSK सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. गेल्या दोन दिवसांपासून, बेंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे आणि सामन्याच्या दिवशीही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, “दुपार किंवा संध्याकाळी विजेच्या गडगटांसह पाऊस पडण्याची शक्यता असेल.” असे असले तरी दोन्ही संघ सामन्याचा जोरदार सराव करत असून, क्रीडाप्रेक्षक देखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत.
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…