Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीSant Dnyaneshwar Maharaj Janmotsav : माऊलींचा ७५०व्या जन्मोत्सव सोहळा! 'ज्ञानोबा माऊली'च्या जपात...

Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav : माऊलींचा ७५०व्या जन्मोत्सव सोहळा! ‘ज्ञानोबा माऊली’च्या जपात आळंदीत भाविकांची मांदियाळी

७ दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू’, असे म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीत सुरू झाला आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav )

https://prahaar.in/2025/05/03/water-crisis-for-pune-residents-water-supply-to-be-cut-off-for-one-day-a-week/

सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी निरनिराळ्या सुविधा देण्यासाठी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, आळंदीकर ग्रामस्थ भाविकांना सुरक्षा, सुविधा देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav)

दरम्यान, आज सकाळी ज्ञानेश्वरी पूजन आणि विनापूजन करत या सोहळाला सुरुवात करण्यात आली. हे पूजन वारकरी संप्रदायात असणारे मुख्य सांप्रदाय प्रमुख डॉ. नारायण जाधव महाराज यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले आहे. तसेच जन्मोसवानिमित्त वारकरी सप्रदायाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.

मुख्यमंत्री लावणार हजेरी

आजपासून १० मे पर्यंत आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमंत्रण दिले असून सोहळ्यात त्यांची हजेरी लागेल, अशी अपेक्षा आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Janmotsav)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -