रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) संगमेश्वर तालुक्यामधील आरवली राजवाडी (Aravali Rajwadi) परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा (Leopard) दुर्दैवी मृत्यू झाला. राजवाडी मारुती मंदिरासमोर आज सकाळी ही घटना निदर्शनास आली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची पाहणी केल्यावर असं दिसून आले की, बिबट्या रात्री महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असण्याची शक्यता आहे. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
https://prahaar.in/2025/05/03/earthquake-tremors-felt-in-jammu-and-kashmir-and-gujarat/
आज सकाळी काही ग्रामस्थांना महामार्गावर बिबट्याचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला (Forest Department) दिली. महामार्गावर वन्यजीवांचा वावर आणि अशा प्रकारचे अपघात चिंताजनक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…