जम्मू आणि काश्मीर: पाकिस्तानी बँक एलओसीच्या जवळील आपल्या शाखा बंद करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी बँक हबीब बँक लिमिटेडने (HBL Bank) नियंत्रण सीमा रेषेनजीक असलेल्या सर्व शाखा बंद केल्या आहेत. यामागील कारण सीमेवरील तणाव असल्याचे सांगितले जाते.
पाकव्याप्त काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रक्कड धार बाजारची शाखा कालपासून अचानक बंद करण्यात आली, आणि त्याबाहेर “सीमा क्षेत्रातील सुरक्षा समस्यांमुळे बँका आणि एटीएम बंद आहेत” अशी सूचना लावण्यात आली. स्थानिकांचा असा दावा आहे की, हाजिरा, खाई गाला आणि तराखलच्या शाखा कधीही बंद होऊ शकतात. याला कारणीभूत पाकिस्तान सैन्याकडून सीमारेषेवर केला जात असलेला गोळीबार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्यामध्ये कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरचा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध उचललेल्या कठोर कारवाईमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारतीय लष्कराच्या तिन्ही गटांना फ्री हॅन्ड दिला आहे. यामुळे भारत कधीही युद्ध करू शकते अशी भीती पाकिस्तानला आहे. या भीतीपोटी पाकिस्तान सीमा रेषेवर गोळीबार करत आहे. ज्याला भारतीय सैन्याकडून देखील प्रत्युत्तर मिळत आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…