Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीEarthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

Earthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : जम्‍मू काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुजरातमध्ये काल (दि २) रात्री ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला. तर जम्‍मू काश्मीरमध्ये रात्री झालेल्‍या भूकंपाची तीव्रता २.७ इतकी नोंदवली गेली. लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्‍के जाणवले आहेत. या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता ३.९ इतकी नोंदवली गेली. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (जीएसडीएमए) नुसार, गुजरात भूकंपाच्या बाबतीत उच्च जोखीम असलेले क्षेत्र आहे. गेल्या २०० वर्षांत येथे ९ मोठे भूकंप झाले आहेत.

https://prahaar.in/2025/05/03/work-on-the-stalled-escalator-at-dombivli-railway-station-begins/

जीएसडीएमएच्या मते, २६ जानेवारी २००१ रोजी कच्छमध्ये झालेला भूकंप गेल्या २ शतकांमध्ये भारतात आलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता. अंदाजे १३ हजार ८०० लोक मृत्युमुखी पडले आणि १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले. पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे भूकंप होतात. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या ताणतणाव आणि क्रियाकलापांमुळे हे प्रामुख्याने आपत्ती म्हणून घडतात. भारतात भूकंप येण्याचे मुख्य कारण म्हणजे हिमालयीन प्रदेशातील टेक्टोनिक क्रियाकल्‍प. येथील तणाव भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील होणाऱ्या धडकेमुळे आहे. यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि भूकंप होतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -