नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या लष्कर – ए – तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.एकूण चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पुरावे भारताला मिळाले. हल्लेखोरांपैकी एक पाकिस्तानच्या सैन्याचा कमांडो असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की सरकार न्याय देणार. प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखू, शोधू आणि शिक्षा करू. गरज पडली तर त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू पण न्याय करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर अंगोलाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…