Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Local Train: मोटरमनचा कामबंद इशारा... मुंबई लोकल कोलमडणार?

Mumbai Local Train: मोटरमनचा कामबंद इशारा… मुंबई लोकल कोलमडणार?

मुंबई: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळं मूक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे सोमवारी लोकल सेवा कोलमडण्याची (Mumbai Local Train) शक्यता आहे.

दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित असून, 4 मे पासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही जादा काम न करण्याचा निर्णय समस्त मोटरमनने घेतला आहे. रिक्त पदांमुळं मोटरमनांना अधिकचे काम करावे लागते. ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यावर त्याचा परिणाम होताना दिसत असल्याचं मोटरमनचं म्हणणं आहे.

मध्य रेल्वेकडे पुरेसे मोटरमनच नाही

सध्या मध्य रेल्वेवर दररोज हजार लोकल धावतात. मात्र या लोकल सेवा चालवण्यासाठी मध्य रेल्वेकडे पुरेसे मोटरमन नाहीत. त्यामुळं मोटरमन यांना अधिकचे फेऱ्या चालवाव्या लागतात. असे असले तरी, मोटरमन कॅबमध्ये कॅमेरे बसवून, प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करणाऱ्या मोटरमनवर संशय व्यक्त केला जात आहे, असे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) व्यक्त केले. त्यामुळे रविवारपासून जादा काम न करण्याचा निर्णय मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.

चाकरमान्यांना बसणार फटका

काम बंद आंदोलन रविवारपासून जरी सुरु होत असले, तरी या आंदोलनांचा मोठा परिणाम सोमवारी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासावर होऊ शकते. कारण आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असते, अशावेळी काही मिनिटं जरी लोकल उशिराने आली, तरी प्रवाश्यांचा खोळंबा उडतो. त्यामुळे, या आंदोलनाचा परिणाम लोकलसेवेवर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं अर्थी मुंबई ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नीट परीक्षेमुळे मेगाब्लॉक नाही

नीट-2025 परीक्षा दिनांक 4 मे रोजी होत आहे. त्यामुळे नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सोईस्कर प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरही रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -