हवामानात बदल आणि जलवाहतुकीचा गोंधळ!
गेटवे टू मांडवा जलमार्गावर प्रवाशांचे हाल
अलिबाग : शनिवारच्या दुपारी ४ वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आणि गेटवे-मांडवा जलमार्गावरील अजंठा कंपनीच्या बोटींची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली. यामुळे अलिबागकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
उन्हाळी सुट्टी, शनिवार-रविवारचा दिवस, त्यात बोटी बंद असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करत ताटकळत बसण्याची वेळ आली.
https://prahaar.in/2025/05/03/next-4-days-are-important-warning-of-unseasonal-rains-with-gusty-winds/
मात्र मालदार व पीएनपी या कंपन्यांच्या बोटी दर दोन तासांनी सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे या बोटींवर प्रवाशांची विशेष गर्दी झाल्याचं दिसून आलं.
गर्दीचा अंदाज घेता, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, हवामानाच्या चटकन बदलणाऱ्या स्थितीमुळे प्रवाशांना अचानक फटका बसण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामान व जलवाहतूक अपडेटची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.