भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या घटनेने भिवंडी परिसर हादरले आहे .
भिवंडी शहरातील फेणे गावात लालजी बनवारीलाल भारती हा यंत्रमाग कामगार आपल्या कुटुंबासोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
https://prahaar.in/2025/05/03/tigerbhai-will-be-seen-in-aathi-batmi-futli/
लालजीच्या पत्नीने ३ मुलींसह आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे.
दरम्यान नक्की महिलेने कोणत्या कारणास्तव आपल्या मुलींसह ही आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट नसून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…