Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल...

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा ‘एआय’ प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

‘एआय’ प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. राज्यात आणि देशात एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनात एआय प्रणालीचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ए आय युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विषद केली.

ते पुढे म्हणाले की, ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहीर केले. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये तर उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून जिल्ह्याची महत्त्वाची ओळख आहे. आता पुढची २५ ते ५० वर्षे हा महाराष्ट्रातला नाही, तर देशातला पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार आहे, असे ते म्हणाले.

सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा, त्याला त्याचे काम पूर्ण करून तो आनंदाने परत आपल्या गावाकडे निघावा, या दृष्टिकोनातून ‘एआय’चा वापर होणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला, वेळेत दाखले मिळाले पाहिजेत, शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी मित्र’ उभा करतोय, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’युक्त झाला म्हणजे काय, याचे सादरीकरण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोर करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा रोल मॉडेल म्हणून जगासमोर आणि राज्याच्या समोर उभा राहील, याचा मला अभिमान आहे,” असे नितेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -