Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वलोकांकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा! ६,२६६ कोटी अद्याप पडून... कसे आणि कुठे...

लोकांकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा! ६,२६६ कोटी अद्याप पडून… कसे आणि कुठे जमा करायचे? जाणून घ्या

RBI च्या अहवालातून महत्वाची माहिती समोर

मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) २००० रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेऊन जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत, परंतु या नोटांपैकी मोठ्या प्रमाणात नोटा अजूनही लोकांकडे पडून आहेत. हे इतके मोठे आहेत की त्यांची एकूण किंमत तब्बल ६२६६ कोटी रुपये आहे. आरबीआयने शुक्रवारी सादर केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती दिली आहे. नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती.

आरबीआयने शुक्रवारी दिनांक २ मे रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, १९ मे २०२३ रोजी व्यवहार बंद होताना २००० रुपयांच्या एकूण नोटांचे मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते, ते ३० एप्रिल २०२५ रोजी व्यवहार बंद होताना ६,२६६ कोटी रुपयांवर आले आहे. अशाप्रकारे, १९ मे २०२३ पर्यंत, चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ९८.२४ टक्के नोटा परत आल्या आहेत.

कुठे जमा कराल 2000 रुपयांचा नोटा?

ज्या लोकांकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा असतील तर ते आताही या नोटा जमा करू शकतात. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये जावे लागेल, कारण २०००च्या नोटा बँक शाखांमध्ये जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा फक्त ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उपलब्ध होती. ९ ऑक्टोबर २०२३ पासून, आरबीआयची जारी कार्यालये व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. याशिवाय, लोक भारतीय पोस्टाद्वारे देशातील कोणत्याही आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -