Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीKedarnath Trip : केदारनाथला जाताय? मग या अद्भुत ८ ठिकाणांना नक्की भेट...

Kedarnath Trip : केदारनाथला जाताय? मग या अद्भुत ८ ठिकाणांना नक्की भेट द्या!

भारतातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे केदारनाथ. केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यात केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले आहे. केदारनाथ मंदिरात दरवर्षी लाखो लोक येतात. अनेकजण मंदिरात दर्शनासह पर्यटनासाठी पोहोचतात. केदारनाथची खासियत म्हणजे तिथले शंकराचे मंदिर. उत्तराखंड राज्यातील केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. इथे जाण्यासाठी फक्त पायवाट हा एकाच मार्ग उपलब्ध आहे. इथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. हिमालयाच्या उंच शिखरावर वसलेल्या या मंदिरांच्या आजूबाजूला अशी अनेक अद्भूत ठिकाणे आहेत जी एकदा तरी पाहिलीच पाहिजे. या ठिकाणांचे सौंदर्य तुमचे डोळे दिपवून टाकतील. यावर्षी केदारनाथला जाण्याचा प्लॅन करत असाल तर खाली नमूद केलेल्या ठिकणांना भेट देऊन आनंद घ्यायला विसरू नका.

गौरीकुंड


गौरीकुंड याला पार्वतीकुंड असेही संबोधले जाते. केदारनाथला ट्रेकिंगची सुरुवात गौरीकुंडानेच केली जाते. इथे पार्वतीच्या मंदिरासोबतच गरम पाण्याचे दोन तलावदेखील आहेत. पार्वतीचे हे मंदिर प्राचीन काळात बनवण्यात आले आहे. या मंदिराबबाबत अशी श्रद्धा आहे की, येथील खडकावर बसून देवी पार्वतीने ध्यान केले होते. त्यामुळे केदारनाथला गेल्यावर या मंदिराला आणि गरम पाण्याच्या तलावाला नक्की भेट द्या.

https://prahaar.in/2025/04/30/try-this-homemade-mask-today-for-soft-and-glowing-skin/

तुंगानाथ मंदिर


जगातील सर्वोच्च मंदिरांच्या यादीत तुंगानाथ मंदिराचा समावेश होतो. या जागेचे सौंदर्य तुम्हाला मोहून टाकेल. केदारनाथला जाताना या ठिकाणाला नक्की भेट द्या. इथे जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा कॅबचा पर्याय निवडू शकता. अनेकजण केदारनाथला आल्यावर या मंदिराला निश्चितच भेट देतात.

भैरवनाथ मंदिर


केदारनाथ मंदिरापासून १ किलोमीटरच्या अंतरावर भैरवनाथ मंदिर वसलेले आहे. इथे जाण्यासाठी गौरीकुंडातून जावे लागते. या मंदिरात भगवान भैरनाथांची सुंदर मूर्ती बसवण्यात आलेली आहे. भैरवनाथांना केदारनाथ मंदिराचा संरक्षक देवता मानले जाते. त्यामुळेच केदारनाथला गेल्यावर भैरवनाथ मंदिराच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळ बघायला विसरू नका.

चंद्रशिला ट्रेक

ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण एकदम उत्तम आहे. गौरीकुंड ते तुंगानाथ मंदिरापर्यंतच्या ट्रॅकला चंद्रशिला ट्रॅक असे म्हटले जाते. या ट्रेकिंग दरम्यान फार सुंदर दृश्ये पाहायला मिळतात.

वासुकी तलाव

केदारनाथपासून ८ किमी अंतरावर वासुकी तलाव आहे. केदारनाथला गेल्यावर अनेक लोक या तलावाला पाहण्यासाठी पायी जातात. वासुकी हे नागाचे नाव आहे. समुद्रमंथनासाठी एका बाजूने देवांनी आणि दुसऱ्या बाजूने रक्षकांनी वासुकीला पकडून समुद्रमंथन केले होते. याच वासुकीने इथे वास्तव्य केले आहे असे मानले जाते. या जागेच्या सौंदर्याला एकदा तरी जरूर पहा.

सोनप्रयाग

सोनप्रयाग गौरीकुंडपासून ५ किलोमीटर आणि केदारनाथपासून १८ किलोमीटर अंतरावर आहे. सोनप्रयागला विशेष धार्मिक महत्त्व आहे कारण ते भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या लग्नाचे स्थान होते असे म्हटले जाते. सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गाच्या वरदानांनी वेढलेल्या या ठिकाणी मंदाकिनी आणि बासुकी नदी एकत्र येतात. केदारनाथच्या वाटेवर रुद्रप्रयाग आणि गौरीकुंड यांच्यामध्ये सोनप्रयाग आहे. गौरीकुंड येथून निघून सोनप्रयाग मार्गे कॅब, सामायिक जीप किंवा रुद्रप्रयागहून निघणाऱ्या बसने तुम्ही पोहोचू शकता.

चोपटा

८५ किलोमीटर अंतरावर असलेलं ‘मिनी स्वित्झर्लंड ऑफ उत्तराखंड’ म्हणून ओळखले जाणारे एक भव्य गाव आढळते. हे गाव पर्यटकांनी फार कमी शोधले आहे मात्र हे गाव त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चोपता हे उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बर्फाच्छादित वंडरलँडमुळे वर्षभर आनंद लुटता येणारे सुट्टीचे ठिकाण आहे. हे पंच केदारच्या मध्यभागी स्थित आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या ५ शिव मंदिरांचा समावेश आहे. त्याच्या डावीकडे केदारनाथ आणि मदमहेश्वरची तीर्थे आहेत; त्याच्या उजवीकडे रुद्रनाथ आणि कल्पेश्वराची तीर्थे आहेत आणि त्याच्या वर लगेचच वसलेले तुंगनाथ मंदिर आहे.

रुद्रप्रयाग


पवित्र मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात वसलेले हे पवित्र स्थळ अजूनही मुख्य शहर केंद्रापासून ७६ किलोमीटर अंतरावर आहे. चार धाम यात्रेला जाणारे बहुसंख्य यात्रेकरू येथे थांबतात. रुद्रप्रयाग हे नाव भगवान शिवाच्या रुद्र अवतारावरून पडले आहे. हे नंदनवन शहर बर्फाच्छादित पर्वत, उधळणाऱ्या नद्या, चमकणारे झरे आणि पन्ना तलावांनी वेढलेले आहे. अलकनंदा नदीचे पाच संगम म्हणून ओळखले जाणारे पंच प्रयाग पैकी एक रुद्रप्रयाग येथे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -